Tuesday, April 3, 2018

निघालो घेवून दत्ताची पालखी…. Nighalo Ghevun Dttachi Palakhi…..



निघालो घेवून दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ ||

रत्नाची आरास साज मखमलीची
त्यावरी सुगंधी फुले गोड ओळी, झुळूक कोवळी चंदना सारखी || १ ||

सात जन्माचि हो लाभली पुण्याई
म्हणुनी जाहलो पालखीचे भोई, शांतमय मूर्ती पाहते सारखी || २ ||

वात वळणाची जवालागे ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी, दोलीयात गंगा जाहली बोलकी || ३ |

माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा…. (Mauli cha Murthi Vitthalachi, Vitthala Mayabapa…..)




माऊली च मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||

काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला
अभंगाला जोड टाळ चिपळ्याची, माऊली च मूर्ती विठ्ठलाची || १ ||

लेकरांची सेवा केलीस तू आई, आs आs आs लेकरांची सेवा
कस पांग फेडू कस होवू उतराई, तुझ्या उपकारा जागी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठ्ठाई, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची || २ ||

कानडा राजा पंढरीचा… Kanda Raja Pandharicha……




कानडा  राजा पंढरीचा
वेदानाही नाही कळला अंत पार यांचा …. || धृ ||

निराकार तो निर्गुण ईश्वर
कसा प्रगटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा … || १ ||

परब्रह्म हे भक्तांसाठी
उभे थकले भिमेसाठी
उभा राहिला भाव सांवयव
जणू कि पुंडलिकाचा … || २ ||

हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबाची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा … || ३ ||

नाम घेता उठाउठी…. Nam Gheta Uthauthi….





नाम घेता उठाउठी,
होय संसाराची तुटी || धृ ||

ऐसा लाभ बांधा गांठी
विठ्ठल पायी मिठी  || १ ||

नामापरते साधन नाही
जें तू करिसी आणिक कांही || २ ||

हाकरोनी सांगे तुका
नाम घेता राहो नका || ३ ||

विठू माऊली तू माऊली जगाची……. Vithu Mauli Tu Mauli Jagachi…





विठू माऊली तू माऊली जगाची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा || धृ ||

काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा विठ्ठला
अभंगाला जोड टाळ चीपल्याची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || १ ||

लेकरांची सेवा केलीस तू आई
आ आ आ लेकरांची सेवा
कस पांग फेडू आता कस उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळूनी जीव माझा सावळे विठ्ठाई
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलाची
माऊलीच मूर्ती विठ्ठलाची … || २  ||

पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू

अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग…..Abir Gulala Udhalit Rang, Natha Ghari Nache Majha Sakha Pandurang…..






अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग || धृ ||
उंबरठ्याशी कैसे शिवू आम्ही जाती हीन
रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्हीलीन, पायरीसी होवू दंग गावूनी अभंग || १ ||

वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू, चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू
विठ्ठलाचे नाव घेवूनि निसं:ग || २ ||

आषाढी कार्तिकी भक्त जन येती साधुजन येती
पंढरीच्या वाळवंटी संत गोळा होती, चोख म्हणे नाम घेता भक्त होती दंग || ३ ||

वनमाळी वनमाळी वनमाळी….Vanmali Vanmali Vanmali







वनमाळी वनमाळी वनमाळी
राधे तुला बोलावितो वनमाळी || धृ ||

वेणी फुलाची जाई जुईची, वर मोत्याची माळ || १ ||

साडी जरीची चोळी बुटयाची, नेसुनी चंद्रावर || २ ||

एका जनार्दनी पूर्ण कृपेने, भक्ती माझी भोळी || ३ ||

निघालो घेवून दत्ताची पालखी…. Nighalo Ghevun Dttachi Palakhi…..

निघालो घेवून दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान, डुलते हळूच दत्ताची पालखी || धृ || रत्नाची आरास साज मखमलीची त्...